तर मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण देणे अशक्य : फैजपूरातील प्रचार सभेत अमित शहा
महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन
It is impossible to give 10 percent reservation to Muslim community : Amit Shah in a campaign meeting in Faizpur फैजपूर (10 नोव्हेंबर 2024) : मुस्लीम समाजाला 10 टक्के आरक्षण द्यायचं म्हटलं तर ओबीसी दलित आदिवासी यांचे आरक्षण कमी करून देणे शक्य नाही परंतु विरोधक हे सत्तेसाठी आंधळे बनले आहेत मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिद्धांतांवर चालणार आपले केंद्रासह राज्यातील सरकार आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या महायुती सरकारने खूप चांगले काम केले असून विकासाची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी पुन्हा महायुती सरकारला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी फैजपूर येथे रविवारी प्रचार सभेत केले.
यांच्या प्रचारार्थ सभा
महायुतीचे रावेर मतदारसंघाचे उमेदवार अमोल जावळे, भुसावळचे उमेदवार संजय सावकारे, चोपड्याचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगरचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची सोमवारी प्रचार सभा झाली. तत्पूर्वी सभेला केंद्रीय क्रीडा युवा कल्याण मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उमेदवार अमोल जावळे, संजय सावकारे, डॉ.कुंदन फेगडे आदींनी संबोधित केले. अमित शहा यांनी व्यासपीठावर येताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले आणि थेट भाषणाला सुरुवात केली.
सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवला
अमित शहा म्हणाले की, मला सांगा कश्मीर हा आपला भाग आहे किंवा नाही. 370 कलम हटवणे आवश्यक होते किंवा नाही असा प्रश्न श्रोत्यांना विचारला आणि हे काम एनडीए सरकारने केले आहे. सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवला आहे पण विरोधकांना देशाच्या सुरक्षेचे काहीही पडलेले नाही. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि आमच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत विचार आणि संस्कृतीची रक्षा केली आहे. गरिबांना घरे, मोफत धान्य, लाडकी बहीण योजना आदी कल्याणकारी योजना राबवल्याचे शहा म्हणाले.
विरोधक सत्तेसाठी झाले आंधळे
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा निवडून द्या, लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये महिना केला जाईल, महाराष्ट्रात भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी यांची भक्कम अशी महायुती आहे. महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार आल्यानंतर 25 लाख नोकर्या, दहा लाख विद्यार्थ्यांना ट्युशन फी देणे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना रुपये 15 हजार रुपये देण्यात येतील. काँग्रेसच्या काळात महाराष्ट्र गुंतवणूक आणि विकासाच्या बाबतीत नंबर चार होता तर आता नंबर एक वर आहे. स्व.हरिभाऊ जावळे यांनी या भागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तर आता त्यांचे सुपुत्र अमोल जावळे ह उमेदवार असून त्यांना साथ द्या, विजयी करा. अमित शहा यांनी यावेळी माजी खासदार स्वर्गीय गुणवंतराव सरोदे, माजी मंत्री स्वर्गीय जे.टी महाजन यांचे स्मरण केले आणि महाराष्ट्रात विकासाची परंपरा कायम ठेवण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
जळगाव हा भाजपाचा बालेकिल्ला : गिरीश महाजन
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव जिल्हा हा भाजप आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. गेल्यावेळी फक्त एकमेव रावेरची आपली जागा थोड्या मतांनी हुकली मात्र आता रावेरसह जिल्ह्यातील सर्व 11 जागा महायुतीच्या निवडून येतील, असा विश्वास आहे. केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, ज्या पद्धतीने आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आघाडी देऊन मला प्रचंड मतांनी निवडून दिले त्याचप्रमाणे आताही महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे.
यांची प्रमुख उपस्थिती
व्यासपीठावर प्रमुख उपस्थितांमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अर्चना चिटणीस, बन्सी लालजी गुजर, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, राजेंद्र फडके, खासदार स्मिता वाघ, जळके महाराज, रावेरचे उमेदवार अमोल जावळे, भुसावळचे उमेदवार संजय सावकारे, मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, चोपड्याचे चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, अशोक कांडेलकर, नंदकिशोर महाजन, अजय भोळे, डॉ.केतकी पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.कुंदन फेगडे, हिराभाऊ चौधरी, विलास चौधरी, भरत महाजन, उमेश फेगडे आदी उपस्थित होते.