कल्याणमध्ये व्हॅनमध्ये एक कोटी 30 लाखांची रोकड सापडली


कल्याण (10 नोव्हेंबर 2024) :  निवडणुकीचा रंग जोर धरत असताना दुसरीकडे राज्यात रोकड सापडण्याच्या घटनाही समोर येत आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी 280 कोटींची रोकड जप्त केली असून रविवारी सकाळी विक्रोळी परिसरात पथकाने 6 हजार 500 किलो चांदी जप्त केली तर कल्याण गांधारी परिसरात भरारी पथकाने एक व्हॅनमधून 1 कोटी 20 लाखांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
भरारी पथकाची कारवाई
रविवारी कल्याण गांधारी परिसरात निवडणूक भरारी पथकाकडून वाहन तपासणीवेळी एका व्हॅनमध्ये एक कोटी रुपये 20 लाखांची रोकड मिळाली आहे. या व्हॅनमध्ये एकूण रक्कम एक कोटी 20 लाखांची असल्याची माहिती आहे. या रक्कमेत तफावत आढळल्याने ही व्हॅन ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. प्रश्नांची उत्तर व्यवस्थित न मिळाल्याने आता रक्कम आयकर विभागाकडे देण्यात येणार आहे.

अधिकार्‍यांनी दिलेली माहिती अशी, पावणेसहा वाजता एटीएमची गाडी पकडली. त्यांनी या गाड्यात 1 कोटी 20 लाख रुपये असल्याचे सांगितले पण यात तफावत आढळल्याने काययेसीर कारवाई केली जात आहे.


कॉपी करू नका.