जळगावातील गॅस सिलेंडर स्फोटातील चौथ्या रुग्णाचाही मृत्यू


जळगाव (12 नोव्हेंबर 2024) : जळगावात अवैध गॅस रिफिलींग सेंटरवर वाहनात गॅस भरतांना सिलिंडर स्फोट होवून आतापर्यंत तीन जणांचा मृतयू ओढवल्यानंतर आता पुन्हा एका जखमीचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपुर्वी वाहनात बसलेल्या भरत दालवाला यांचा मृत्यू झाला तर वडीलांपाठोपाठ दोन दिवसात सुरज भरत दालवाला (23, रा.यमुना नगर) या तरुणाचा देखील मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. स्फोटातील गंभीर जखमींपैकी चौथा बळी गेल्यानंतर देखील जिल्हा प्रशासनाने कुठलीही दखल घेतल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आतापर्यंत चौघांचा मृत्यू
जळगाव शहरातील यमुना नगरात राहणारे भरत दालवाले यांच्याकडे पुण्याहून नातेवाईक आले होते. त्यांना घेवून ते अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरावर जाण्यासाठी त्यांनी वाघ नगरातील संदीप शेजवळ यांचे वाहन बुक केले. 5 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास ते अमळनेरला जात असतासंना वाहन चालक ईच्छदेवी पोलीस चौकीशेजारी असलेल्या गॅस रिफिलींग सेंटवर वाहनात गॅस भरण्यासाठी थांबला.

दरम्यान, गॅस सिलींडरचा स्फोट होवून वाहनात बसलेल्या दालवाले कुटुंबियांसह दहा जण गंभीर जखमी झाले होते. यातील गंभीर जखमी झालेल्या सुरज याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्याच्यावर उपचार सुरु असतांना सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

.दालवाले कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. भरत दालवाले हे मजूरी करीत होते तर त्यांचा मोठा मुलगा सुरज हा शहरातील कापड दुकानात बिलींगचे काम करुन वडीलांना हातभार लावित होता. गॅस सिलींडरच्या स्फोटात त्यांचे संपुर्ण कुटुंब गंभीररित्या भाजले गेले होते. दोन दिवसांपूर्वीच शनिवारी भरत दालवाले यांचा मृत्यू झाला होता, आता त्यांच्या मुलाचे निधन झाल्याने दालवाले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अवैधरित्या सुरु असलेल्या गॅस सिलींडर स्फोटात चार जणांचे बळी गेले असून अजून सहा जणांवर पुण्यासह खासगी व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. यातील पाच जणांची प्रकृती देखील चिंताजनक आहे.


कॉपी करू नका.