सुवर्णपेठेत सोन्याच्या दरात घसरण : जाणून घ्या नेमकी बातमी
जळगाव (13 नोव्हेंबर 2024) : तुम्ही सोन्याची खरेदी करीत असल्यास तुमच्यासाठी ही बातमी निश्चितच आनंददायी आहे. ग्राहकांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून सलग तिसर्या दिवशी सोने दरात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत एकच दिवसात सोने दरात तब्बल 1600 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदी दरातही घसरण झाली. चांदीचा प्रति किलोचा दर 2000 रुपयांनी घसरला आहे. यामुळे ऐन लग्नसराईदरम्यान दर घसरल्याने ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात घसरण सुरू आहे. मंगळवारी सोने विनाजीएसटी 77,700 रुपये प्रति तोळा इतका होता. त्यात 1600 रुपयांची घसरण होऊन आज बुधवारी सकाळच्या सत्रात सोने 76 हजार 100 रुपये प्रति तोळ्यावर आले तसेच चांदीचा भाव विनाजीएसटी 89 हजार 500 रुपये प्रति किलोवर आली. सोने भाव तर महिनाभराच्या नीच्चांकीवर आले आहे. 11 ऑक्टोबर रोजी ते 76 हजारांवर होते. 1 नोव्हेंबरपासून सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले.
12 दिवसांतील सोने भाव पाहिले तर ते तीन हजार 900 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यात 12 नोव्हेंबरची एकाच दिवसातील घसरण 1500 रुपयांची आहे. गेल्या तीन दिवसांचा विचार केला असता सोने दरात तब्बल 2100 रुपयांची घसरण झाली. चांदी दरात 2000 ते 2500 रुपयाची घसरण झालीय.
दरम्यान, मंगळवारी तुलसी विवाह झाला. यांनतर आता लग्नसराईला सुरुवात होणार असून याकाळात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.