काय सांगता ! धुळे जिल्ह्यात कंटेनरमध्ये आढळल्या 94 कोटींच्या चांदीच्या विटा


धुळे (बुधवार, 20 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला वाहन तपासणीत कंटेनरमध्ये चक्क 94 कोटी रुपये किंमतीच्या चांदीच्या विटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बँकेचा मुद्देमाल असल्याची माहिती
बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी एका कंटेनरची तपासणी केली असता त्यात 10 हजार किलो चांदीच्या वीटा मिळाल्या आहेत. 30 किलो चांदीची एक वीट अशा 336 विटा आहेत. त्याची किंमत 94 करोड 68 लाख रुपये इतकी आहे. याबाबत माहिती मिळतात पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हा ऐवज एचडीएफसी बँकेचा असल्याची माहिती असून पोलिस व्हेरिफाय व पेपर्सची ऑथेंटिसिटी चेक करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली.

 


कॉपी करू नका.