राज्यातील महायुती सरकारचा उद्या शपथविधी ! : संभाव्य मंत्री पदाची नावे आली समोर
Swearing-in ceremony of the grand alliance government in the state tomorrow!: Names of possible ministerial posts revealed मुंबई (24 नोव्हेंबर 2024) : राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागांवर यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार तसेच कुणा-कुणाला मंत्री पदाची संधी मिळणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला असून महाविकासअ ाघाडीचा दारुण पराभव झाला. मविआला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
उद्या शपथविधी सोहळा
स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु झाली आहे. कुणाच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार, याचीही राज्यात चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारचा उद्या सोमवार, 25 नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार आहे. हा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांच्यासह केंद्रातील दिग्गज नेते या शपथविधीला हजर राहतील. यावेळी कोण-कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. ज्यांचे आमदार जास्त, त्याला जास्त मंत्रिपदे मिळतील, अशी शक्यता आहे.
संभाव्य मंत्र्यांची नावे अशी
भाजप-
देवेंद्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रकांत पाटील
मंगलप्रभात लोढा
रवींद्र चव्हाण
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
आशिष शेलार
गणेश नाईक
प्रवीण दरेकर
राहुल नार्वेकर
गिरीष महाजन
अतुल भातखळकर
नितेश राणे
राहूल कूल
संजय कुटे
माधुरी मिसाळ
पंकजा मुंडे
मंदा म्हात्रे
देवयानी फरांदे
एकनाथ शिंदे शिवसेना-
एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
दादा भुसे
भरत गोगावले
संजय शिरसाट
उदय सामंत
दीपक केसकर
संजय राठोड
शंभूराज देसाई
अब्दुल सत्तार
अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस-
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
आदिती तटकरे
धर्मरावबाबा आत्रम
अनिल पाटील
नरहरी झिरवाळ
आण्णा बनसोडे