अंजाळे घाटात दुचाकी घसरून अट्रावलचा वृद्ध जखमी


यावल- भुसावळकडून यावलला येत असतांना अंजाळे घाटात दुचाकी घसरून अट्रावलचा 65 वर्षीय वृध्द गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. सुभाष भास्कर चौधरी (रा.अट्रावल) असे जखमीचे आहे. अंजाळे जवळील घाटात बारीक वाळू पसरली असून या वाळुमुळे वाहन घसरण्याचे प्रकार घडत आहेत. बुधवारी सुभाष चौधरी हे भुसावळहून यावलकडे येत असताना घाटात त्यांची दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ एका वाहनात टाकुन यावल ग्रामीण रूगणालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉ.एन.डी.महाजन, अधिपरीचारीका प्रियंका मगरे, सुमन राऊत, संजय जेधे, कादर तडवी, शशीकांत पवार यांनी प्रथमोपचार केल्यानंतर अधिक उपचारार्थ त्यांना जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले.


कॉपी करू नका.