शरद पवारांच्या ‘या’ आवाहनाची आता राज्यभरात चर्चा

तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी कशी लागू शकते ? ; प्रशासनावर निशाणा


सोलापूर (8 डिसेंबर 2024) : फेरमतदान घेणार्‍या मारकडवाडी गावामध्ये शरद पवार यांनी भेट दिली. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मारकडवाडी गावामध्ये शरद पवारांनी परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री यांच्यावर निशाण साधला. तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये ठराव करा. आम्हाला ईव्हीएममुळे मतदान नको, तो ठराव आम्हाला द्या, द्या आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवू, असा शब्द पवारांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांना दिला आहे.

अमेरिका, इंग्लंडसह युरोपमधील सगळे देश बॅलेट पेपरवर मतदान घेतात. अनेक देशांनी सुरू असलेलं ईव्हीएम बंद केले त्यामुळे इथल्या सर्व अडचणींवर एकच पर्याय असल्याचे ते म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !