कुर्ल्यात मद्यधूंद चालकाने 40 वाहनांना उडवले : सात जणांचा मृत्यू


कुर्ला (10 डिसेंबर 2024) : इलेक्ट्रिक बसवरील मद्यधूंद चालकाने समोर येईल त्या वाहनांना धडक देत वाहन दामटल्याने सात जणांचा मृत्यू ओढवला. ही भीषण थरार सोमवारी रात्री 10 वाजता घडला. कुर्ल्यातील लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील आंबेडकरनगर भागात ‘बेस्ट’ शहर वाहतूक सेवेवरील मद्यधूंद चालकांना 30 ते 40 वाहनांना धडक दिली.

बसचालक पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू
अचानक अनियंत्रित झाल्याने क्षणार्धात काय झाले हे चालकालाही कळले नाही. एका कोपर्‍यात जाऊन बस धडकल्यानंतर जमावाने त्याला खाली ओढले मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून चालकाला ताब्यात घेतले. तो खरेच दारू प्यालेला होता का, याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. मनपाच्या अधिकार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवान मदतीला धावून आले.

अनियंत्रीत बस बाजारपेठेत
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, या मार्गावर नेहमीप्रमाणे वर्दळ असताना अचानक अनियंत्रित झालेली बस बाजारपेठेत घुसली. दिसेल त्या वाहनाला तिने चिरडले. त्यामुळे सर्वजण भयभीत झाले. सुमारे 500 मीटरपर्यंत ही बस गाड्या चिरडत होती, नंतर एका कोपर्‍यात जाऊन धडकली. परिसरातील लोकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र बचावकार्यासाठी एक तासाने रुग्णवाहिका आली.

 

https://x.com/ANI/status/1866325264499876234?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1866325264499876234%7Ctwgr%5Edafa213239f8042c62bece2d4f682268d7476143%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmumbai%2Fthe-death-toll-in-the-kurla-bus-accident-rises-to-6-dead-and-49-injured-a-a629%2F


कॉपी करू नका.