जळगावात महाविद्यालयीन युवकाला अडवून मारहाण


जळगाव (14 डिसेंबर 2024) : चित्रपट पाहुन रात्री घरी जात असताना 21 वर्षीय महाविद्यालयीन युवकाला दोघांनी अडवून चापटा बुक्क्यांनी , लाथांनी खाली पाडुन बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना सोमवार, 9 रोजी रात्री आकाशवाणी चौकात वेलनेस मेडीकलजवळ घडली. या प्रकरणी बुधवार, 11 रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हा युवक पिंप्राळा परिसरात वास्तव्यास आहे. तो सिनेमा पाहण्यासाठी शहरात गेला होता. रात्री तो आकाशवाणी चौकाकडून घरी जात होता. या चौकात दोन संशयितांनी त्याला पाहताच चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथा मारुन त्याला खाली जमिनीवर पाडत पुन्हा मारहाण केली. या घटनेत युवक जखमी झाला.

या प्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात उमाकांत वाघ, तसेच आकाश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोनि राकेश मानगावकर यांनी भेट देऊन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ही घटना अधिक जाणुन घेण्यासाठी तसेच संशयितांचा शोध घेण्याकामी चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा शोध घेऊन फुटेज प्राप्त करुन तपासाला वेग दिला जाईल,अशी माहिती सुत्रांनी दिली. गुन्ह्याचा तपास पोहेकॉ सलीम तडवी हे करीत आहेत.


कॉपी करू नका.