धरणगावजवळ बस-ट्रॅक्टरमध्ये अपघात ; एक जण ठार तर 21 प्रवासी जखमी
ळगाव (14 डिसेंबर 2024) : धरणगाव-चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळ बस व ट्रॅक्टरमध्ये अपघात झाल्याने या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू ओढवला तर 21 प्रवासी जखमी झाले आहेत.
पहाटेच्या सुमारास अपघात
शनिवार, 14 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पिंपळे गावाजवळील फाट्यावर ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 ई.जी.3952) व जळगाव-शिरपूर (बस क्रमांक एम.एच.14 बी.टी.3910) मध्ये अपघात झाला. बस चालकाच्या कॅबीनचा चुराडत्त झाला तर एक प्रवासी ठार झाला.
बस चालकासह 21 प्रवासी गंभीर
बस अपघातात जाकीर शब्बीर खाटीक (35, रा.पिंप्री), शब्बीर रहे मुल्ला खाटीक (65, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (68, पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (50, जळगाव), अनिश हनीफ शेख (38, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (28, रोटवद), भगवान सुपडू पाटील (75, रा. पिंपळेसिम), जयश्री गणेश मराठे (45), शरद बिलाडिया पारधी (40, नंदुरबार), विमल रमेश मराठे (65, नळयात), रमेश सोनू मराठी (75), कमलबाई काशिनाथ मराठे (75), वरुड प्रवीण भगवान कुंभार (24, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (38, साळवा), सुषमा कपिलसिंग बयास (36, धरणगाव), मेघना कपिलसिंग बयास (7, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (36, धरणगाव), सुनील रामसिंग अलकारी (58, जळगाव), अनिता सुनील अलकारी (52, जळगाव), नंदा वसंत बाविस्कर (33, साळवा) आणि व्ही.व्ही. इंगोले (40, जळगाव) आदींहस बसचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
धरणगाव पोलिसांची धाव
धरणगाव पोलीस निरीक्षक पवन देसले व सहकार्यांनी धाव घेत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.