जळगावातील लाचखोर अभियंत्यांसह तिघे एसीबीच्या जाळ्यात


नवीन विद्युत मीटरसाठी मागितली दोन हजारांची लाच

जळगाव : नवीन विद्युत मीटर बदलून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणार्‍या वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोघांना बुधवारी एसीबीच्या पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. कनिष्ठ अभियंता दीपक केशव पाटील (32, रा. नशिराबाद) व खाजगी पंटर नीलेश दामू जाधव (वय 25, रा. अयोध्यानगर) व कंत्राटदार नितीन गोविंदा परदेशी (वय 29, रा. प्रभात चौक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नीलेश लोधी, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.