शिरपूर तालुक्यातील पैश्यांचा पाऊस प्रकरण : तिघा आरोपींविरोधात नरबळीसह जादूटोणा अधिनियमान्वये गुन्हा


Shirpur taluka money rain case : Crimes under witchcraft act including human sacrifice against three accused शिरपूर (18 डिसेंबर 2024) : पैश्यांचा पाऊस पाडण्याच्या मोबदल्यात दिड लाख रुपये उकळून फसवणूक करण्याच्या उद्देशाने आलेल्या मांत्रिकासह दोघांवर गोळीबार झाला होत. ही घटना शिरपूर तालुक्यातील शेमल्या व दुर्बळ्या गावाला लागून असलेल्या जंगलात घडली होती. या घटनेनंतर संशयीतांनी गोळीबार केल्याने दोघे जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी पैश्यांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणार्‍यांविरोधात अंधश्रद्धा विरोधी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. राज्यात अशा प्रकारे हा पहिलाच गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे.

काय आहे नेमके प्रकरण
मध्य प्रदेशातील बहाणपूर व खंडवा येथील काही जणांना पैशांचा पाऊस पाहण्याचे आमिष दाखवून बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना शेमल्या व दुर्बळ्या गावाला लागून असलेल्या जंगलात नेल्यानंतर अर्धवट नारळ जाळून पूजा विधी करण्यात आला. कथित मांत्रिक गुलजारसिंग उर्फ गुज्जरसिंग तारसिंग पावरा याने पूजा केली व या कामी शिवा सीताराम पवरा, संतोष पावरा (रा.सलईपाडा) यांनी मदत केली. पैशांचा पाऊस न पडल्यामुळे दिड लाख रुपये परत मागितल्यावरून वाद ओढवला. गणेश रामदास चौरे (30), रतीलाल गणपत तायडे (वय (50), अंकित अनिल तिवारी (25), विशाल करणसिंग कश्यप (39) यांनी गोळीबार केल्याने कथित मांत्रिक गुजरसिंग व शिवा हे जखमी झाले. दरम्यान, गुजरसिंगसह दोघांनी पैश्यांच्या पाऊस पाडण्याच्या आमिषाने फसवणूक केली शिवाय अंधश्रद्धा निर्माण केल्याने त्यांच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2003 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. संशयीत संतोष पसार झाला आहे. गोळीबार करणार्‍या चौघांना शिरपूर न्यायालयाने दोन दिक्स पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.


कॉपी करू नका.