संसद भवनाच्या गेटवर आंदोलनांना बंदी


नवी दिल्ली जळगाव (21 डिसेंबर 2021) : संसदेच्या परिसरात गुरुवारी झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आता कोणत्याही राजकीय पक्ष किंवा खासदारांच्या गटा ला संसद भवनाच्या गेटवर धरणे किंवा आंदोलन करता येणार नाही, असा आदेश जारी केला आहे .

या निर्देशांनंतर संसद भवनाच्या कोणत्याही गेटवर आंदोलन करता येणार नाही. लोकसभा अध्यक्ष कार्यालयाने हे निर्देश जारी करताना संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच कामकाज सुरळीत चालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.






संसद भवनाच्या परिसरात इंडिया आघाडीच्या खासदारांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून आंदोलन केले जात असताना, गुरूवारी विरोध पक्षांचे खासदार आणि एनडीएचे खासदार आपापसात भिडले होते. भाजपाने आरोप केला की त्यांचे दोन खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत यांना विरोधी पक्षांच्या खासदारांनी ढकलून दिल्याने ते जखमी झाले आहेत. भाजपा खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी दावा केला की राहुल गांधी यांनी एका खासदराला ढकलले ज्यामुळे ते खाली पडले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !