पुन्हा विमान अपघात : 151 प्रवाशांचा मृत्यू
Another plane crash: 151 passengers killed वृत्तसंस्था । सोल (29 डिसेंबर 2024) : विमान अपघातांची मालिका कायम आहे. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर विमानाचा अपघात घडला असून त्यात 151 प्रवाशांचा मृत्यू ओढवला आहे. बँकॉकहून जेजू एअरचे विमान रविवारी मुआर विमानतळावर येत असताना लॅण्डींग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे.
न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह 181 लोक होते. आतापर्यंत 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आल्याची माहिती बचाव पथकाने दिली आहे. उर्वरित प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.





