‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत आता 1500 रुपये : मंत्री अदिती तटकरेंची माहिती

अडीच लाखांआत हवे उत्पन : चारचाकी असल्यास बंद होणार रकमेचा लाभ चौकशी होणार


मुंबई (3 जानेवारी 2025) :  लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थी महिलांचे अर्ज तपासले जाणार आसून सरकारी नोकरी असलेल्या किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास त्यांना पैसे मिळणार नाहीत शिवाय ज्या महिलांना पेन्शन मिळते, त्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही व ज्या महिलेच्या नावावर चारचाकी कार आहे त्यांनादेखील लाभ मिळणार नाही. या योजनेत अर्ज करणार्‍या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असण्याची अट असून महिलांच्या कुटुंबातील कोणी जर आमदार किंवा खासदार असेल तर त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्टपणे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

अर्जांची होणार फेर तपासणी
लाडकी बहीण योजनेमुळे देशभरातील लाखो महिलांना मोठा फायदा झाला. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये येत आहे मात्र आता या योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांची फेरतपासणी होणार आहे. या संदर्भात आतापर्यंत फक्त चर्चा सुरू होती, मात्र आता खरंच फेर तपासणी होणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वत: सांगितले आहे.






अनेकांनी मिळवले गैरवापर करून पैसे
लाडकी बहिण योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले, अशा तक्रारी ज्या भागांमधून आल्या तिथे फेर तपासणी होणार आहे मात्र आता सगळ्या अर्जांची फेरतपासणी होणार असल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही अद्यापही काही अर्जांची छाननी होण्याचं काम बाकी आहे. या अर्जांची छाननी देखील काटेकोर पद्धतीनं होणार आहे. अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता फेर तपासणीत जर अशा महिला आढळल्या तर त्यांना यानंतर खात्यावर पैसे येणार नाहीत अशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.

लाडकी बहीण योजनेची पात्रता
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !