कुंभमेळा 2025 : रेल्वे कर्मचार्यांच्या हिरव्या जॅकेटवरील स्कॅनरद्वारे प्रवाशांना तिकीट काढता येणार
Kumbh Mela 2025 : Passengers will be able to get tickets through the scanner on the green jackets of railway employees नवी दिल्ली (5 जानेवारी 2025) : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी रेल्वेमार्गे देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत . उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज विभागाने ,तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. रेल्वे कर्मचार्यांच्या हिरव्या रंगाच्या जॅकेटवर लावलेल्या स्कॅनरद्वारे प्रवासी तिकीट काढू शकतील.
भाविकांना सहज मिळणार तिकीट
प्रयागराजला 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत कुंभमेळा होणार आहे. भाविकांना सहज रेल्वे तिकिट काढण्यासाठी यूटीएस पबाबत जागृती करण्यात येणार आहे. यूटीएस पचा क्यूआर कोड प्रत्येक ठिकाणी लावणे शक्य नाही. प्रवासीही क्यूआर कोडबाबत अनभिज्ञ असतील. त्यामुळे जिथे रेल्वे कर्मचारी उभा असेल तेथे क्यूआर कोड असेल.





खिडकीवरील गर्दीवर नियंत्रण
रेल्वे कर्मचारी हिरवे जॅकेट परिधान करणार असून जॅकेटच्या मागील बाजूस एक क्यूआर कोड लावण्यात आला आहे. मोबाइलवरून तो स्कॅन करून यूटीएस प डाऊनलोड करता येणार आहे. प्रवाशांना रांगेत उभे न राहता या पवरून अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा मिळेल. त्यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
