आधीच काँग्रेस कमकुवत त्यात पृथ्वीराज चव्हाणांच्या वाक्याने देशात खळबळ : म्हणाले ; दिल्लीत आप पक्षाची सत्ता येणार !


नवी दिल्ली (9 जानेवारी 2025) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली होणार्‍या निवडणुकीत आपची सत्ता येणार असल्याचे विधान केल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

काय म्हणाले चव्हाण
आययएनएस दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, दिल्लीच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. मला विश्वास आहे की, तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे आणि निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आणि आपमध्ये युती व्हायला हवी होती मात्र तसे होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यवर खुलासा केला आहे. काँग्रेसकडूनही त्यांच्यावर टीका झाली. ते म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता. आता सर्व प्रमुख पक्ष रिंगणात उतरल्याने खुली निवडणूक झाली आहे. काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली आहे आणि मला खात्री आहे की आपण विजयी होऊ.

दिल्लीत 70 जागांवर 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. येथे भाजपा, आप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. गेल्यावेळी आपने दिल्लीत दणदणीत विजय मिळवला होता. मात्र यावेळी कोणाचा विजय होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 


कॉपी करू नका.