मोदी सरकारचे मोठे गिप्ट : सरकारी कर्मचार्यांसाठी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी
Modi government’s big gift: Eighth Pay Commission approved for government employees नवी दिल्ली (16 जानेवारी 2025) : मोदी सरकारने सरकारी कर्मचार्यांसाठी लाभदायी असलेल्या आठव्या वेतन योजनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात सरकारी कर्मचार्यांच्या पगारात आता घसघशीत वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाने देशभरातील सरकारी कर्मचारी सुखावले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली.
कर्मचार्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील लाखो सरकारी कर्मचार्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचार्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी सरकारनं आठवा वेतन आयोगाला मंजुरी दिली असून सातवा वेतन आयोग 2026 मध्ये संपणार असलातरी तत्पूर्वीच सरकारने आठव्या आयोगाला मंजुरी दिली आहे. 1947 पासून आतापर्यंत सात वेतन आयोग लागू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक रेग्युलर पे कमिशन बनवण्याता संकल्प केला होता. ज्याप्रमाणे 2016 मध्ये सातवा वेतन आयोग सुरू झाला होता. हा 2026 पर्यंत चालणार होता. परंतु त्याच्या एका वर्षापूर्वीच सरकारनं याला मंजुरी दिली आहे, असं अश्विनी वैष्णव म्हणाले. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले.





