जळगावातील महिलेला टास्क देत सायबर भामट्यांचा पाच लाखांचा गंडा
Cyber criminals duped a woman from Jalgaon of Rs 5 lakh by giving her a task जळगाव (19 जानेवारी 2025) : टास्कवर आधी सायबर ठगांनी अधिक नफा दिला. त्यानंतर टास्क चुकीचा केला, अशी बतावणी करत गृहिणीला सायबर ठगांनी 5 लाख 29 हजार 616 रुपयांचा गंडा घातला. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर शहरातील महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
असे आहे फसवणूक प्रकरण
40 वर्षीय महिला मुळ पुणे येथील असुन त्या सध्या रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. 6 जानेवारी ते 14 जानेवारी 2025 पावेतो वेळोवेळी त्यांच्या टेलीग्राम आयडी यावर जानवी सेठी, सिध्दार्थ मल्होत्रा यांनी संपर्क त्यांच्याशी संपर्क साधला. ट्रेडिंग वीक्सक्वाईन या टेलीग्राम ग्रुपमध्ये ड केले. तसेच टास्कबद्दल मोठा नफा कसा मिळवून देतो, असे अमिष दाखविले.
त्यानुसार गृहिणी महिलेस पहिल्या दोन टास्क वर नफा देवून महिलेस जाळ्यात घेतले. त्यानंतर टास्क चुकीचा केल्याचा दावा सायबर ठगांनी केला. महिलेकडुन त्याची रिकव्हरी म्हणुन वेगवेगळ्या कारणास्तव महिलेच्या बँक खात्यामधुन 5 लाख 29 हजार 616 रुपये ऑनलाईन स्विकारुन फसवणूक केली. फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली. याप्रकरणी सायबर ठगांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोनि सतिष गोराडे हे करीत आहेत.
काय आहे फंडा
पार्ट टाइम जॉब देण्याची अफलातून योजना सांगत मोठ्या प्रमाणात नफा सायबर ठग ग्राहकाला दाखवितात. त्याला टेलिग्राम या पच्या माध्यमातून वेगवेगळे ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याचे सांगत फसवणूक करतात. ठगांनी केलेल्या दाव्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. पूर्ण फसवणूक केल्यानंतर सायबर ठग ऑनलाइन गायब होतात. तक्रारदार हे पूर्णपणे आर्थिकरित्या लुबालडे जातात. त्यामुळे अनोळखी कॉलवरुन फायद्याचे, लाभाचे सांगणार्या गोष्टीवर कधीही विश्वास ठेवू नये, हा आर्थिक फसवणुकीपासून बचाव होण्याचा उत्तम मार्ग आहे.