वाघझिरा आश्रमशाळेत रोजंदारी तत्त्वावर कार्यरत कर्मचार्यांचा शाळेतच हृदयविकाराने मृत्यू
यावल (22 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील वाघझिरा येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाची शासकीय आश्रमशाळेत रोजंदारी तत्त्वावर कार्यरत 40 वर्षीय कर्मचार्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्मचार्याला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत्यू घोषित केले. या घटनेमुळे सर्वत्र हळद व्यक्त केली जात आहे.
वाघझिरा, ता.यावल येथे शासकीय आश्रमशोत रोजंदारी तत्त्वावर लुकमान रहेमान तडवी (40) हा तरुण कामाला होता. कर्तव्यावर असतांना मंगळवारी सायंकाळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. तातडीने तिथून त्याला यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे व त्यांच्या अशा मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.