नवीन बांधकामाच्या ठिकाणावरून चोरट्यांनी पाण्याची मोटार लांबवली


जळगाव (24 जानेवारी 2025) : नवीन घराचे बांधकाम चालु असलेल्या ठिकाणाहुन चोरट्याने 9 हजार 500 रुपये किंमतीची पाण्याची इलेक्ट्रीक मोटार चोरुन नेली. ही घटना रविवार ,19 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रियाज अब्दुल हमीद ( वय 22 रा. उमर कॉलनी, शिवाजीनगर) यांचे शिवाजी नगरातील मरीयम पार्क येथे नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी पाणी मारण्यासाठी लावलेली मोटार चोरट्याने चोरुन नेली. गुन्ह्याचा तपास हवालदार गजानन बडगुजर हे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !