राज्यात लालपरीचा प्रवास महागला : आजपासून भाडेवाढीला मंजुरी
State’s Lal Pari travel becomes more expensive : Fare hike approved from today मुंबई (24 जानेवारी 2025) : लालपरीने अर्थात एस.टी.ने प्रवास करणार्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. एस.टी.महामंडळाने बसच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून तब्बल 15 टक्के भाडे वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. शुक्रवार] 24 जानेवारीपासून भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाकडून 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणार्या बैठकीत 14.95 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक ढाली. या बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली.
आजपासूनच एसटीच्या नवीन तिकिट दर लागू होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. या नवीन दरवाढीमुळे प्रवाशांना सरासरी 70 ते 80 रुपयांनी जास्त पैसे मोजावे लागतील. उदाहरणार्थ, आतापर्यंत 100 रुपयांना मिळणारे तिकीट आता 115 रुपयांना मिळेल.
एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी ही भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या खिशाला चाप बसणार आहे, कारण त्यांना आता प्रत्येक प्रवासासाठी जास्त पैसे द्यावे लागतील.