ममता कुलकर्णी नव्हे आता श्री यमाई ममता नंदगिरी


Not Mamta Kulkarni, now Shri Yamai Mamta Nandagiri प्रयागराज (26 जानेवारी 2025) : ‘करण अर्जुन’ सह विविध सिनेमांमध्ये झळकलेल्या अभिनेता ममता कुलकर्णी हिने नुकतेच महाकुंभाच्या संगमावर पिंडदान केले व पट्टाभिषेक कार्यक्रमही झाला. आता ममताचे नवे नाव श्री यमाई ममता नंदगिरी असून तिने घेतलेल्या या अनोख्या निर्णयाची सध्या चर्चा सुरू आहे. ममताने हे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखं असल्याचे विधान केले आहे.

यात सगळं स्वातंत्र्य
साध्वी बनल्यानंतर ममता कुलकर्णीने माध्यमांना मुलाखत दिली. ती म्हणाली, 144 वर्षांनंतर हा क्षण आला आहे. यातच मला महामंडलेश्वर बनण्याची संधी मिळाली. हे केवळ आदिशक्तीच करु शकते. मी किन्नर आखाड्याचीच निवड केली कारण यात सगळं स्वातंत्र्य आहे. कोणतेही निर्बंध नाहीत.

पुन्हा अभिनय करणार का यावर ममता म्हणाली, आयुष्यात तुम्हाला सगळंच पाहिजे. मनोरंजनही हवंच. ध्यान ही अशी गोष्ट आहे. नशिबानेच मिळते. गौतम बुद्धांनीही बरंच काही पाहिलं आणि नंतर त्यांच्यात परिवर्तन झालं. पण आता अभिनय करण्याची मी कल्पनाही करु शकत नाही. ते शक्य नाही. किन्नर आखाड्याचे लोक महादेव आणि माता पार्वती यांच्या अर्धनारेश्वर अवताराचं प्रतिनिधित्व करतात. अशा आखाड्याची महामंडलेश्वर बनणं हे माझ्यासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकण्यासारखंच आहे. माझ्या 23 वर्षांच्या साधनेनंतर मला ही संधी मिळाली.


कॉपी करू नका.