ना हरकतसाठी एक लाखांची घेणार्या नंदाणेतील आजी-माजी सरपंचाला कोठडी
Nandane’s grandmother-former sarpanch who took Rs 1 lakh for no objection sent to custody धुळे (26 जानेवारी 2025) : पेट्रोल पंपाच्या जागेवर ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती अडीच लाखांची लाच मागून त्यातील पहिल्या टप्प्याचे एक लाख रुपये स्वीकारताना धुळे तालुक्यातील नंदाणे ग्रामपंचायतीचे सरपंच व माजी सरपंच यांना धुळे एसीबीने अटक केली होती. संशयीत सरपंच रवींद्र निंबा पाटील (42) व माजी सरपंच अतुल विठ्ठल शिरसाठ (50) यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
29 वर्षीय तक्रारदार यांच्या मालकीची मौजे नंदाने, धुळे येथे गट नंबर 59/3 येथे शेतजमीन आहे. या जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळण्यासाठी विभागीय व्यवस्थापन नायरा एजन्सी लिमिटेड यांनी 1 सप्टेंबर रोजी धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला. . त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच/ग्रामसेवक ग्रामपंचायत नंदाने ता. यांच्या नावे पेट्रोल पंप उभारणी करिता ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांना दिले व तक्रारदाराने त्यांचे मित्र योगेश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. सरपंचांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करिता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्यासाठी 24 रोजी पाच लाख रुपये लाच मागितली.
पडताळणीअंती पाच लाखांत तडजोड होवून अडीच लाख रुपये मागण्यात आले व त्यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेता आजी-माजी सरपंचांना अटक करण्यात आली होती.
तपास धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी व सहकारी करीत आहेत.