पृथ्वीराज मोहोळ 67 वा महाराष्ट्र केसरी : शिवराज राक्षेसह महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित
Prithviraj Mohol 67th Maharashtra Kesari अहिल्यानगर (3 फेब्रुवारी 2025) : अहिल्यानगरात रविवारी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागाच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजयी ठरून 67 वा महाराष्ट्र केसरी बनला. अंतीम सामन्याआधी गोंधळ उडाला. गोंधळानंतर अंतिम लढत सुरू करण्यात आली होती. यावेळी पहिल्या फेरीपासूनच पृथ्वीराज मोहोळ आघाडीवर होता. महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले आणि पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित झाला.
निकालावर आक्षेप, मैदान सोडले
सलग दुसर्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर भारी पडला आणि सामना जिंकला. महेंद्र गायकवाड याने निकालावर आक्षेप घेत मैदान सोडले. पंचांसोबत वाद झाल्यानंतर महेंद्र गायकवाड उघडा होऊन मैदानाबाहेर गेला.
या कुस्तीच्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळने टाकलेले डाव यशस्वी ठरले. या डावात महेंद्र गायकवाड फसला आणि त्याने मैदान सोडले. पंचांच्या निर्णयावरही त्याने आक्षेप घेतला. दुसरीकडे, पृथ्वीराज मोहोळच्या विजयानंतर त्याच्या सहकार्यांनी एकच जल्लोष केला आणि त्याला खांद्यावर घेऊन आखाड्यातच त्याची मिरवणूक काढली. पृथ्वीराज मोहोळ याने विजयानंतर आनंद व्यक्त केला. या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देऊन पृथ्वीराज मोहोळचा सन्मान केला. तसेच त्याला थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला, तर माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार होता. या लढतींमध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान मारले. त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगला आहे.
शिवराज राक्षे म्हणाले, आपण तिसर्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकू नये म्हणून आपल्यावर अन्याय करण्यात आला असा आरोप शिवराज राक्षेने केला. तो म्हणाला की, आपले दोन्ही खांदे टेकले नव्हते, पाठही टेकली नव्हती. तसे असेल तर स्वतः हार मानतो. आपल्याला पराभूत करण्यासाठी हे जाणूनबुजून करण्यात आले. त्यावर आपण रिव्ह्युची मागणी केली आहे. सामन्याचा व्हिडीओ पाहून त्यावर निर्णय द्यावा अशी मागणी आपण केली आहे.
शिवराज राक्षेच्या कोचनेही पंचांवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, कुस्तीत दोन्ही खांदे टेकले असते तर शिवराज हारला असता. तसे असते तर मी स्वतः त्याला बाजूला नेले असते. पण पंचाच्या निर्णयावर अपील देणे गरजेचे होते. टीम रेफ्रीने स्क्रीनवरती पाहून निर्णय देणे गरजेचे होते. आम्हाला हा निर्णय मान्य नाही.