राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत भुसावळसह नाशिकमधील स्पर्धक विजयी


भालोद, ता.यावल (3 फेब्रुवारी 2025) : राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागातर्फे ऑनलाईन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेमध्ये राज्यभरातील एकूण एक हजार 137 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत एकूण 10 प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे विचारण्यात आले होते.

भुसावळसह नाशिकमधील स्पर्धक विजयी
एकूण 364 स्पर्धकांनी 20 पैकी 20 गुण मिळवले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे तसेच उत्तेजनार्थ क्रमांकांसाठी 25 पारितोषिके आणि 12 विशेष पारितोषिके एका विशेष समारंभात विजेत्यांना दिली जाणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे व उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, संयोजक प्रा.डॉ.सुनील नेवे यांच्या प्रमुख उपस्थितीत निकाल जाहीर करण्यात आला. त्यात प्रथम- तृप्ती भागवत जवरे (भुसावळ-जळगाव), द्वितीय- सुरेंद्रसिंग भगतसिंग मगर (कोठोडे-नाशिक), तृतीय क्रमांक- पल्लवी राहुल धांडे (भुसावळ-जळगाव) तसेच एकूण 25 उत्तेजनार्थ तसेच 12 विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !