भुसावळात महिलेला शिविगाळ : पाच जणांविरोधात गुन्हा
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2022/01/Crime.gif)
भुसावळ (7 फेब्रुवारी 2025) : लहान मुलाने दगड मारल्याचे सांगितल्यानंतर महिलेस शिविगाळ करून धमकावण्यात आले. ही घटना शहरातील गंगाराम प्लॉट भागात 3 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा करण्यात आला.
संशयीतांविरोधात गुन्हा
रत्नाबाई किरण महाजन (42, गंगाराम प्लॉटजवळ, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, लहान मुलांच्या भांडणानंतर संशयीतांच्या घरी मुलाने दगड मारल्याचे सांगितल्यानंतर संशयीतांनी घरी येत शिविगाळ केली तसेच घरात राहणे मुश्कील करू, अशी धमकी दिली. संशयीत रिता तुषार महाजन, हर्षा जगदीश भारंबे, तुषार सुखदेव भारंबे, अनिल सुखदेव भारंबे, सुनील सुखदेव महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल दुकळे करीत आहेत.
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/mantri-niwad.jpg)