37 वर्षीय महिलेला लग्नाचे वचन देत केला बलात्कार : तरुणाविरोधात गुन्हा दाखल


37-year-old woman raped on promise of marriage : Case registered against youth अमळनेर (7 फेब्रुवारी 2025) : अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 37 वर्षीय महिलेची ओळख 2008 मध्ये चारूदत्त विलास पाटील (37, रा.कुर्‍हाकाकोडा, ता.मुक्ताईनगर) याच्याशी झाली होती. चारूदत्तने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या गावी आणि नाशिक येथे वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला मात्र लग्नाची विचारणा केली असता लग्न करण्यास नकार दिला आणि महिलेला शिवीगाळ करीत मारहाण केली.

या त्रासाला कंटाळून महिलेने मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता चारूदत्त विलास पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करत आहेत.


कॉपी करू नका.