करुणा शर्मा यांचा धक्कादायक आरोप : वाल्मीक कराडने आपल्याला चुकीचा स्पर्श केला !


मुंबई (7 फेब्रुवारी 2025) : धनंजय मुंडे यांच्यासोबत वाद वाढल्यानंतर बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मीक कराड याने आपल्याला चुकीचा स्पर्श केल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

अंगाला गैरस्पर्श केल्याचा आरोप
गुरुवारी न्यायालयाने करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर माध्यमांसोबत बोलत असताना करुणा शर्मा यांनी वाल्मीक कराडवर गंभीर आरोप केला. करुणा शर्मा म्हणाल्या,बीड जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मीक कराड याने माझ्यावर हात उगारला होता तसेच वाल्मीक कराड याने माझ्या अंगाला गैरस्पर्श करत मारहाण केली, असा गंभीर आरोप शर्मा यांनी केला.

माझ्या पतीसमोर कराड याने माझ्यावर हात उगारला. मी यावेळीचा सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी मागणी केली होती. पण मला ते अजूनही मिळालेले नाही, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही शर्मा यांनी केली.


कॉपी करू नका.