कुवारखेडा येथे चाकूहल्ल्यात तरुण गंभीर जखमी
Youth seriously injured in knife attack in Kuwarkheda जळगाव (7 फेब्रुवारी 2025) : जळगाव तालुक्यातील कुवारखेडा येथे कारण नसताना तरुणावर छोट्या चाकूने वार करून छातीवर गंभीर दुखापत करण्यात आली. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. याप्रकरणी सायंकाळी साडेसहा वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
जळगाव तालुक्यातील कुवारखेडा येथे प्रदीप गोकूळ पाटील (40) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घरी असतांना गावातील रवींद्र भीमराव पाटील (कुवारखेडा) याने काहीही कारण नसतांना प्रदीप पाटील याला शिवीगाळ केली. शिवीगाळ का करत आहे असा जाब प्रदीपने विचारला. या रागातून रवींद्र पाटीलने हातात लहान चाकू त्याच्या छातीवर मारून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र भीमराव पाटील (कुवारखेडा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार दिनेश पाटील करीत आहे.