नंदुरबार शहरात एक कोटी 81 लाखांच्या वैध गुटखा, गांजासह दारूवर फिरवला रोलर
न्यायालयाच्या आदेशानंतर यंत्रणेची कारवाई
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/ndb-01.gif)
Rollers on liquor along with legal gutkha and ganja worth Rs 1.81 crore seized in Nandurbar city नंदुरबार (7 फेब्रुवारी 2025) : राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा मोहिमेंतर्गत व न्यायालयाच्या आदेशानंतर नंदुरबार येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या निर्देशानुसार विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त केलेला एक कोटी 81 लाख 80 हजार 36 रुपयांचा अवैध गुटखा, गांजा व दारू शुक्रवारी नष्ट करण्यात आली.
कोट्यवधींच्या मुद्देमालावर फिरवला रोलर
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, सारंगखेडा, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, नवापूर, विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये अवैधरित्या गुटखा, गांजा व दारू जप्त करण्यात आली होती. हा सर्व मुद्देमाल एकत्रीत आणून त्यावर रोलर फिरवून मुद्देमाल नाश करण्यात आला. राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखडा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील कालबाह्य मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने नाश करण्याची प्रक्रिया राबवण्याचे आदेश मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या उपस्थितीत मुद्देमालावर रोलर फिरवण्यात आला.
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/mantri-niwad.jpg)