रावेर-बर्हाणपूर रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त : फैजपूरच्या दोघांविरोधात गुन्हा

रावेर (14 फेब्रुवारी 2025) : फैजपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांना गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्याने शुक्रवारी सकाळी पथकाने एका वाहनातून चार लाख 81 हजार 120 रुपयांचा गुटखा जप्त करीत फैजपूर येथील दोन जणांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास बर्हाणपूर रस्त्यावर मालवाहू अॅपेरिक्षा (एम.एच.03 एएच 7322) या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात दोन लाख 72 हजार 272 रुपये किंमतीचा सुगंधीत केसरयुक्त विमल पान मसाला, 87 हजार 120 रुपये किंमतीचा 20 प्लास्टिक पिशवीतील सुगंधीत केसरयुक्त विमल पानमसाला तसेच नऊ हजार 680 रुपये किंमतीचा 20 प्लास्टिक पिशवीत तंबाखू तसेच 48 हजार 48 रुपये किंमतीचा 28 प्लास्टिक पिशवीतील तंबाखू मिळून च्त्तर लाख 17 हजार 120 रुपयांचा विमल गुटखा व 60 हजार रुपये किंमतीची पॅजो रिक्षा जप्त करण्यात आली.
अक्षय पवार यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात शेख वाजीद शेख आबीद (धोबी वाडा फैजपूर) व शेख जुबेर शेख इकबाल (हाजीरा मोहल्ला, फैजपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.
