मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांना दिलासा : ऑफलाईन मिळणार पासेस
शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या तक्रारीची परीवहन मंत्र्यांकडून दखल
मुक्ताईनगर- बसस्थानकावर शालेय पासेस बनविणेसाठी केवळ एकच संगणक असल्याने शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींना उपाशीपोटी तास न् तास ताटकळत रहावे लागत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांनी पासेस खिडकीवर जाऊन विद्यार्थ्याच्या अडचणीबाबत संबधीत कर्मचार्याशी चर्चा केली. ऑनलाईन सिस्टम स्लो असल्याचे व एकच संगणक असल्याची अडचण सांगण्यात आल्यानंतर पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब भ्रमणध्वनी वरून चर्चा करीत पासेसबाबत होणारी व्यथा मांडली. यानंतर रावते यांनी जळगाव विभागीय नियंत्रकांना तात्पुरत्या स्वरूपात ऑफलाईन पासेस देण्याचे आदेश देत अन्य दोन संगणक बसवण्याच्या सूचना केल्या. प्राथमिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना तात्पुरत्या ऑफलाईन पासेस वाटप करण्यात आल्याने व समस्या मार्गी लागल्योन विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत शिवसेना जिल्हाध्यक्षांचे आभार मानले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी तालुकाप्रमुख छोटू भोई, जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड.मनोहर खैरनार, विधानसभा क्षेत्राप्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी, नगरसेवक संतोष मराठे, बेलसवाडी शाखाप्रमुख मजीद खान, शुभम शर्मा यांच्यासह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.