पिंप्रीसेकम रस्त्यावर किरकोळ वादातून डोक्यात मारला दगड

भुसावळ (20 फेब्रुवारी 2025) : किरकोळ वादातून एकाच्या डोक्यात दगड मारून जखमी करण्यात आले. ही घटना पिंप्रीसेकम रोडवरील लेबर गेटसमोर 16 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहन पंडित डोळे (26, पिंप्रीसेकम) यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत चंद्रकांत विलास कोळी (पिंप्रीसेकम) याने काहीएक कारण नसताना डोक्यात दगड मारून जखमी केले. तपास सहाय्यक फौजदार युनूस शेख करीत आहेत.
