किनगावातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणार्‍या मुख्याध्यापिकेसह तिघांविरोधात गुन्हा


Crime against three people including the principal for providing copies at the examination center in KingaonCrime against three people including the principal for providing copies at the examination center in Kingaon यावल (25 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील किनगाव येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी केंद्राबाहेर चक्क मुख्यध्यापिकाच पालकांसह एका रिक्षात बसून कॉपी करीत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. हा प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानंतर यावल पोलिसात गटशिक्षणाधिकारी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
किनगाव, ता.यावल येथील नेहरू माध्यमिक विद्यालय केंद्रावर सोमवारी सकाळी इयत्ता दहावीचा मराठी द्वितीय व तृतीय विषयाचा पेपर सुरू असताना गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांना माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांचा फोन आला. त्यांनी कळवले की, मनोज राणे (रा.यावल) याच्या ऑटो रिक्षात सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला तायडे व तेथील शिक्षक अमोल भालेराव व त्यांच्यासोबत अजून एक महिला आशा यूसुफ पटेल (रा.यावल) असे तिघे जण कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने नवनीत अपेक्षित प्रश्नसंचातून प्रश्नोत्तरे पाहून कॉपी बनवतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित शिक्षकांविरोधात तक्रार दाखल करुन कारवाईचा अहवाल सादर करा. याप्रकरणी यावल पोलिसात मुख्याध्यापिका शीला गौतम तायडे, शिक्षक अमोल भालेराव, महिला आशा युसूफ पटेल या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.