मराठी भाषेचे पांग फिटणार नाही : प्राचार्य डॉ. रमेश जोशी


भुसावळ (1 मार्च 2025) : मराठी ही सर्वांना ज्ञान देणारी भाषा आहे, मराठी भाषेचे पांग फिटणारे नाहीत, असे विचार श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात मराठी भाष दिन गौरव कार्यक्रमात प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी व्यक्त केले. 27 फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

प्राचार्यांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थी मित्रांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून देताना अनेक उदाहरणे दिली. संत रामदास स्वामींचे मनाचे श्लोक सर्वांसाठी उपयुक्त आहे तसेच संत ज्ञानेश्वर, संत नामदेव,
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या गाण्यांचा उल्लेख त्यांनी केला. प्रा.अनुपम शर्मा यांनी कवी कुसुमाग्रजांच्या जीवनाचा परिचय दिला. डॉ.सुधीर शर्मा यांनी मराठी भाषा सर्वांनी शिकली पाहिजे, असे सांगितले. ग्रंथपाल प्रा.हितेश गुप्ता यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात येऊन मराठी भाषेतून लहान लहान गोष्टींची पुस्तके वाचावी तसेच मराठी वर्तमानपत्र ही वाचावे जेणेकरून आपल्या मनात मराठी भाषेची आवड निर्माण होईल, असे सांगितले.

डॉ.विवेक जोशी यांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून देताना कवी कुसुमाग्रज यांची कणा कविता याविषयी माहिती स्पष्ट करून सांगितली व मराठी भाषा सर्वांनी बोलली पाहिजे असे सांगितले. राहत शेख, सुरेखा राजपूत, धनराज बाविस्कर, बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मराठी कविता वाचून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. आभार प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी मानले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !