मध्यप्रदेशातील असीरगढनजीक शेतात सोने सापडल्याची अफवा : नागरिकांनी मध्यरात्रीची सुरू केला सोन्याचा शोध


बुर्‍हाणपूर (10 मार्च 2025)  : मध्यप्रदेशातील बुर्‍हाणपूर येथील असीरगढ किल्ल्याजवळील शेतात सोन्याचे नाणी सापडल्याची अफवा पसरली आहे. या अफवेमुळे, गेल्या तीन दिवसांपासून शेकडो गावकरी रात्रीच्या वेळी शेतात खोदकाम करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली पण नाणी सापडली नाहीत. आता शनिवारपासून या ठिकाणी थेट सीसीटीव्ही बसवून पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे.

अलीकडे छावा चित्रपटात मध्यप्रदेश राज्यातील बर्‍हाणपूर चा उल्लेख पहायला मिळाला बर्‍हाणपूर हे मुघल काळात प्रमुख व्यापारी केंद्र दाखविण्यात आले आहे त्यामुळे महाराष्ट्रात बर्‍हाणपूर विषयी कुतूहल असताना बर्‍हाणपूर जिल्ह्यात ऐतिहासिक किल्ल्यासाठी ओळखल्या जाणार्‍या असीरगड गावा लगत शेतात सोन्याचे नाणी सापडल्याची अफवा आणि सोन्याच्या नाणी च्या शोधा साठी रात्रीला ग्रामस्थांची झुंबड पहायला मिळाली.

अफवेने नागरिकांची उडाली झोप
असीरगडमध्ये खजिन्याच्या अफवेने इंदूर- मुक्ताईनगर महामार्गालगतच्या शेतात सोन्याचे नाणे सापडल्याची बातमी पसरताच, असिरगढ, झिरि आणि निंबोला या गावातील शेकडो गावकरी रात्री खोदकाम करण्यासाठी तेथे पोहोचले. गेल्या तीन दिवसांपासून लोक टॉर्चच्या सहाय्याने शेतात खड्डे खोदत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अनेक लोक शेतात खोदकाम करताना दिसतात. स्थानिक पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले. तथापि, तोपर्यंत उत्खनन करणारे ते ठिकाण सोडून गेले होते. पोलिसांना शेतात फक्त खड्डे सापडले, नाणी सापडली नाहीत. शनिवारपासून या ठिकाणी पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे.

असीरगड गाव त्याच्या ऐतिहासिक किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. ते बुरहानपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. चार महिन्यांपूर्वीही याच भागात सोन्याचे नाणे सापडल्याची अफवा पसरली होती. त्या वेळीही लोकांनी शेतात मोठ्या प्रमाणात खोदकाम केले होते. आता पुन्हा एकदा एका व्हायरल व्हिडिओमुळे या अफवेला बळकटी मिळाली आहे. लोक अंधारात शेत खोदण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. मुघल काळातील सोन्याचे नाणी येथे पुरले असल्याचा दावा केला जात आहे.


कॉपी करू नका.