भुसावळातील तापी पात्रात एकाची आत्महत्या


भुसावळ (12 मार्च 2025) : शहरातील तापी नदीवरील पूलाने एकाने उडी घेत आत्मत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळ फैजपूर हद्दीत असल्याने फैजपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

समजलेल्या माहितीनुसार, अनोळखी इसमाने तापी पुलावरून उडी घेतली व पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. आत्महत्या केलेल्या इसमाची अद्यापही ओळख पटलेली नाही. फैजपूर पोलिसांकडून अनोळखीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फैजपूर सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.


कॉपी करू नका.