जळगावातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दुचाकी चोरी प्रकरणी बेड्या

जळगाव (12 मार्च 2025) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातून 15 फेब्रुवारी 2025 रोजी सुरेश पंडित चव्हाण (वय 61,रा. हनुमाननगर,मेहरुण) यांची दुचाकी ( एमएच 19 सीई 5768) चोरुन नेली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ही दुचाकी रेकॉर्डवरील गुन्हेगार मोसीन शहा सिंकदर शहा (रा. फुकटपुरा तांबापुरा) याचे चोरी केल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तपास चक्र फिरवून मोसिन शहा याला तांबापुरा येथुन ताब्यात घेतले.
साथीदाराच्या मदतीने ही दुचाकी चोरी केल्याची कबुली देत त्याने चोरलेली दुचाकी पथकाला काढुन दिली. त्याला पथकाने जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, संजय हिवरकर, हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेरावय, हरिलाल पाटील, पोलीस चालक प्रमोद ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली. महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे या तपास करीत आहेत. दुसरा साथीदाराचा शोध सुरू असुन तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.


