फैजपूर शहरात धाडसी घरफोडी : एक लाखांचा ऐवज लंपास

फैजपूर (13 मार्च 2025) : शहरातील तहा नगरातील बंद घरातून चोरट्यांनी एक लाखांचा एैवज लंपास केल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
राजू सुभान तडवी (तडवीवाडा, फैजपूर) यांच्या फिर्यादीनुसार, 10 ते 11 दरम्यान चोरट्यांनी तहा नगरातील त्यांच्या भावाच्या घरातील लोखंडी कपाट तोडून त्यातून 15 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या रिंगा, 78 हजार रुपये किंमतीची व 21 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व आठ हजारांची रोकड लांबवली. तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहेत.


