अकलूदच्या वयोवृद्धाची व्याजांच्या पैशांना तगादून आत्महत्या : दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या


यावल (16 मार्च 2025) : यावल तालुक्यातील अकलूद गावातील 65 वर्षीय वृद्धाने दोघांकडून उसनवार पैसे घेतले होते मात्र व्याजाचा तगादा दोघांनी लावल्याने त्रासाला कंटाळून वृद्धाने भुसावळातील तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दोन जणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांना अटक करण्यात आली.

असे आहे प्रकरण
अकलूद, ता.यावल गावातील प्रभाकर कडू पाटील (65) या वृद्धाला विनोद श्रीराम इंगळे व गणेश भागवत काळे (अकलूद, ता.यावल) या दोघांनी उसनवार पैसे दिले होते. उसनवार दिलेल्या पैशाचे ते व्याज त्यांच्याकडून घेत होते आणि सातत्याने त्यांच्याकडे व्याजाचे पैसे मागण्यासाठी तगादा लावत होते. या त्रासाला कंटाळून पाटील यांनी 12 मार्च रोजी भुसावळत्ततील तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात हिरामण पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिसांनी आरोपींना अटक केली. तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे.


कॉपी करू नका.