साकळी बस स्थानकावरील दुकानास अज्ञाताने लावली आग : दोन लाखांचे नुकसान

यावल (16 मार्च 2025) : यावल तालुक्यातील साकळी गावातील चोपडा रस्त्यावरील अमृततूल्य चहा आणि पानटपरी तसेच वेफरचे दुकानाला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात माथेफिरूने आग लावून दिली. या आगीमध्ये या दुकानातील तब्बल दोन लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे. याप्रकरणी यावल पोलिसात शनिवारी अज्ञात माथेफीरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके ?
साकळी, ता.यावल गावातील बस स्थानकावर चोपड्याकडे जाणार्या रस्त्यावर वीरेंद्र विष्णू लोधी या तरुणाची श्री शिवाय अमृतुल्य चहासह वेफरचे दुकान व पानटपरी आहे. या दुकानाला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अज्ञाताने आग लावली. या आगीमध्ये दुकानातील फ्रिज, 17 खुर्च्या, होम थिएटर, इतर फर्निचर, लाईटिंग, बॅनर आणि विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. यामध्ये या व्यावसायीकाचे दोन लाखांचे नुकसान झाले. आग प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे.


