भुसावळात परिचारिकेला शिविगाळ : माजी आमदार संतोष चौधरींविरोधात अदखलपात्र गुन्हा


भुसावळ (16 मार्च 2025) : मुलाच्या डोळ्यात रंग गेल्याने त्याचा डोळा दाखविण्यासाठी डॉक्टरांकडे आलेल्या माजी आमदार संतोष चौधरी यांना डॉक्टर बाहेरगावी गेल्याचे सांगितल्याने त्याचा राग आला व त्यांनी खाजगी रुग्णालयातील नर्सला (परिचारिकेला) शिविगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप नर्सने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. ही घटना शुक्रवार, 14 रोजी रात्री दोन वाजता घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात चौधरींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे नेमके प्रकरण
भुसावळ शहरातील बद्री प्लॉट भागातील आशा हॉस्पीटलमध्ये परिचारिका मनिषा किशोर मोरे (मोहित नगर, भुसावळ) या कामाला आहेत. शुक्रवारी रात्री दोन वाजेच्या दरम्यान माजी आमदार संतोष चौधरी हे मुलगा जय संतोष चौधरी याच्या डोळ्यात कलर (रंग) गेल्याने त्याचे डोळे दाखविण्यासाठी आशा हॉस्पिटलमध्ये आले होते. यावेळी त्यांना डॉक्टर बाहेरगावी गेल्याचे सांगितल्याचा राग आला व त्यांनी परिचारीकेला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मोरे यांनी करीत बाजारपेठ पोलिसांत तक्रार दिल्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधीत नर्सला ओळखतही नाही ः संतोष चौधरी
माझ्या मुलाच्या डोळ्यात रंग गेल्याने त्याला कार्यकर्त्यांनी रात्री 12 वाजेच्या दरम्यान हॉस्पीटलमध्ये नेले. दोन तास त्यांनी दरवाजा उघडला नाही. माझा मुलगा असल्याने मी तेथे गेला. संबंधीत नर्स ही समोर देखील आली नाही. मी त्यांना ओळखतही नाही. या सर्व प्रकरणामागे राजकिय वास असल्याचे माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले.


कॉपी करू नका.