नंदुरबार शहरातील कुविख्यात बबलू काल्या स्थानबद्ध

Notorious Bablu Kalia arrested in Nandurbar city नंदुरबार (25 मार्च 2025) : पोलीस दप्तरी कुविख्यात असलेल्या व सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या शहरातील शेख शहेबाज शेख शरफुद्दीडीन ऊर्फ बबलू काल्या यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी यांनी या संदर्भात आदेश पारीत करताच पोलिसांनी कारवाई केली.
काल्याविरोधात सात गुन्हे दाखल
कुविख्यात काल्याविरोधात पोलीस ठाणे हद्दीत दंगा घडवून शासकीय नोकरांवर हल्ला करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी करणे, जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघण करणे तसेच सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करणे आदी सात प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपीविरोधात वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनदेखील गुन्हेगाराच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने पोलीस प्रशासनाने आरोपीला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी यांच्याकडे सादर केला व प्रस्तावाला मंजुरी मिळताच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली संशयीताला स्थानबद्ध करण्यात आले.