जळगावात अनोळखी इसमाचा मृत्यू

जळगाव (26 मार्च 2025) : 55 वर्षीय अनोळखी इसम बेशुद्धावस्थेत टॉवर चौकात शनिवारी (22 मार्च) आढळला होता. त्याला उपचारार्थ दाखल केले असता, रात्री 9.15 वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सीएमओ डॉ. निरंजन देशमुख यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेह शवविच्छेदन कक्षात हलविण्यात आला आहे.
ओळख पटवून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यावा, असे आवाहन शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. तपास हवालदार ललित भदाणे हे करीत आहेत.