सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेचे क्रौर्य : भिंतीवर डोके आपटत सासुचा केला खून


जालना (3 एप्रिल 2025) : अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेचे सातत्याने सासूशी खटके पडत असल्याने वादानंतर सुनेने सासुचे डोके भिंतीवर आपटले व चाकूचा वार करीत सासूचा खून केला. मृतदेहाची पोत्यात भरून विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात घर मालकाला संशय आल्याने मृतदेत तेथेच टाकत सुनेने पलायन केले. ही धक्कादायक घटना जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत बुधवारी सकाळी सहा वाजता घडली. सविता संजय शिनगारे (44, आंतरवाली बु.॥, ता.गेवराई) असे खून झालेल्या सासुचे नाव आहे तर प्रतीक्षा आकाश शिनगारे असे अटकेतील आरोपी सुनेचे नाव आहे.

अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न
प्रतीक्षा व आकाशचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते मात्र प्रतीक्षा सातत्याने दुसर्‍या मुलाशी फोनवर बोलत असल्याने सासुसोबत तिचे खटके उडत होते. बुधवारी पहाटे याच कारणावरून झालेल्या वादानंतर सुनेने सासूचे डोके भिंतीवर आपटत चाकूचे वार करीत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी सासुचा मृतदेह पोत्यात भरल्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी बाहेर पडत असताना घर मालकाला संशय आला त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत प्रतीक्षाने मृतदेह टाकून रेल्वेने परभणी गाठले. नंतर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.








तर माझा जीव घेतला असता
मृत महिलेच्या मुलाने आईचा मृतदेह पाहून जिल्हा रुग्णालयात हंबरडा फोडला. ‘माझा जीव घेतला असतातर चाललं असतं, आईला का मारलं?’असा टाहो मृत सविता शिनगारे यांचा मुलगा आकाश शिनगारे याने फोडला.

आईला मारायचं होतं तर लग्न करायची काय गरज होती, पटत नव्हतं तर मला मारायचं होतं, आता मी कुणाकडे पाहून जगू, एवढं निर्दयीपणे कुणी मारतं का असा आक्रोश आकाशने केला. नातेवाईक त्याला धीर देण्याचा, पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होते. परंतु,त् याचे अश्रू थांबत नव्हते. शवविच्छेदनगृहात आईच्या मृतदेहावरील वार पाहून आकाश जागीच खाली बसला. आईच्या चेहर्‍यावर असलेल्या जखमा, डोक्याच्या मागून झालेला रक्तस्राव पाहून त्याचे शब्द गोठले. यामुळे नातेवाइकांनी त्याला सावरत बाहेर आणले.

आकाश हा जालन्यातील खासगी कंपनीत अभियंता आहे. त्याची बदली झाल्यामुळे तो लातूरला गेला होता त्यामुळे घटनेच्या वेळी सासू व सून अशा दोघीच घरात होत्या. मंगळवारी रात्रीच आकाशचे आईसोबत फोनवर बोलणे झाले होते. त्या वेळी आईने जेवण केले का, असे विचारून प्रकृतीची विचारपूस केली होत परंतु सकाळीच हीघटना झाल्याचा निरोप मिळाल्याने धक्का बसल्याचे आकाशने रडतच सांगितले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !