नंदुरबार शहरातील जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू


Youth dies after drowning in swimming pool in Nandurbar city नंदुरबार  (4 एप्रिल 2025) : शहरातील बाळा साहेब ठाकरे जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या ललित सुधीर पाटील (18, ब्राह्मणे, ता.शिंदखेडा) या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला बेशुध्द अवस्थेत शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. ंगला तुंगार यांनी ललित यास तपासून मृत घोषीत केले. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील बाळा साहेब ठाकरे जलतरण तलावात पोहण्यासाठी ललित पाटील, निलेश सुनील पाटील, हर्षल संजय पाटील, दुर्गेश प्रवीण पाटील, हितेश अधिकार पाटील आदी दोंडाईचा येथून रेल्वेने नंदुरबारात आले.




सर्व मित्र हे बाळा साहेब ठाकरे जलतरण तलावात पोहण्यासाठी 3 रोजी गेल्यानंतर ललित सुधीर पाटील हा आठ फुट असलेल्या पाण्यात बुडाला.
नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !