डांभूर्णी बसस्थानकावर 40 वर्षीय इसमास दोघांची जबर मारहाण


40-year-old Ismas severely beaten by two men at Dambhurni bus stand डांभूर्णी, ता.यावल (5 एप्रिल 2025) :  यावल तालुक्यातील डांभूर्णी गावात एका 40 वर्षीय इसमाला बस स्थानकावर काही एक कारण नसतांना गावातील दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच कमरेचा पट्टा काढून त्या पट्ट्याने त्याला जबर मारहाण करीत त्यांच्या डोळ्यावर, मानेवर, चेहर्‍यावर पाठीवर जबर दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

डांभूर्णी गावातील रहिवासी सुधाकर रघुनाथ कोळी (40) हा तरुण डांभूर्णी बस स्थानकावर गेल्यानंतर तेथे भूषण सुभाष कोळी व तेजस उर्फ आमप्या सुनील कोळी यांनी त्याच्याशी कारण नसतांना वाद घातला आणि त्याला शिवीगाळ करून कमरेच्या पट्ट्याने त्याला जबर मारहाण केली. यात त्याच्या पाठीवर, डोक्यावर, चेहर्‍यावर, मानेवर जबर दुखापत झाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !