हळदीत वाजंत्रीवर वाद लावण्याच्या वादातून तरुणांना मारहाण
जळगाव (5 एप्रिल 2025) : हळदीच्या कार्यक्रमात वाजंत्रीवर वाद्य लावण्याच्या कारणावरुन तिघांनी वाद्य वाजविणार्या तरुणांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. हे भांडण सोडविण्यासाठी धावून आलेल्या तरुणालाही मारहाण केली.
बुधवारी (2 एप्रिल) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना धोबी वराड येथे हनुमान मंदिराजवळ घडली. या प्रकरणी बॅण्ड चालक इब्राहिम शहा याकुब शहा फकीर (वय 32,रा. धोबी वराड ता.जळगाव) यांच्या तक्रारीनुसार सोनु मधुकर जाधव, गोलु दशरथ जाधव तसेच गजानन गोविंदा जाधव ( सर्व रा. धोबी वराड) यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी घटनास्थळी माहिती घेतली. हवालदार स्वप्निल पाटील हे तपास करीत आहेत.


